जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

3 weeks ago 9
<strong>श्रीनगर :</strong> जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याच्या हंदवाडामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 5 जवान शहीद झाले आहेत. यात एक कर्नल, एक मेजरसह दोन जवानांचा समावेश आहे. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. यानंतर या परिसरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात देखील शनिवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत.